छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव ; राज्यभरातून शिवभक्त शिवनेरीवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १९ फेब्रुवारी । 19 फेब्रुवारी’ अर्थात (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव. फेब्रुवारी महिना उजाडताच शिवभक्तांना या उत्सवाचे वेध लागतात. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपतींचा हा उत्सव केवळ राज्यापूरताच मर्यादीत राहिलेला नाही तर परराज्यात जगभरात पसरला आहे.किल्ले शिवनेरी येथे शिवजंयती जिल्हाधिकारी याचे हस्ते शिवाई माता याचा आभिषेक करून सुरूवात करण्यात आली यावेळेस हजारो शिवभक्तांनी आपली उपस्थिती दाखवली. यावेळी छत्रपती शिवाजीमहाराज की जय या घोषणा देण्यात आल्या.

आज किल्ले शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होतोय रात्रीपासुन राज्यभरातुन शिवभक्त शिवज्योत घेऊन शिवनेरी गडावर दाखल होऊन सलामी देत आहे.मागील दोन वर्षापासुन किल्ले शिवनेरीवर मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थित शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला मात्र यंदा कोरोना नियमांना शितीलता मिळाल्यानंतर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी येथे कोरोनामुळे मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थितीमध्येच हा सोहळा पार पडणार आहे. शिवजयंती साजरी करण्याच्या अनुशंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गृहविभागाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असली तरी नियम-अटींचे पालन करावे लागणार आहे.
परंपरेनुसार शिवाईदेवीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते तर त्यानंतर सकाळी 10 वाजता मंत्री गण यांच्या समवेत शिवजन्माचा पाळणा, पोलीस दलाकडून मानवंदना आणि शिवकुंज येथील इमारतीमध्ये बाल शिवाजी आणि जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन असे कार्यक्रम होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *