महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १९ फेब्रुवारी । मुंबई पोलिसांनी अभिनेत्री काव्या थापरला अटक केली आहे. मद्यपान करून गाडी चालवण्याचा आणि ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा काव्यावर आरोप आहे. काव्याकडून यावेळी एका व्यक्तीचा अपघात झाला होता. मुंबई पोलिसांनी आता काव्याला अटक केली आहे. न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
काव्या मद्य नशेत होती आणि तिने नशेच्या धुंदीत गाडी चालवत असताना एका व्यक्तीला जखमी केल्यानंतर ती पोलिसांशी गैरवर्तन करताना दिसली. काव्याने अधिकाऱ्यांनाही शिवीगाळ केली. काव्या थापर २६ वर्षांची असून ती मुंबईत राहते.
काव्याने शिक्षण पूर्ण केले त्यानंतरच ती शोबिझमध्ये आली. तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काव्या थापरने काम केले आहे. ‘तत्काल’ या चित्रपटातून काव्याने पदार्पण केले. ही एक शॉर्ट फिल्म होती. यानंतर ती तेलुगु चित्रपट ‘इ माया पेरिमेतो’मध्येही दिसली. तिने ‘मार्केट राजा एमबीबीएस’मध्येही काम केले आहे. काव्या थापर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती काव्या सोशल मीडियालड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.
मुंबईतील हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर कारला धडक दिल्याचा काव्यावर आरोप आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, तिने त्यांनाही शिवीगाळ केली. तिला दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल तुरुंगवास करण्यात आला आहे.