महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २० फेब्रुवारी । मुंबई महापालिकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईत राजकीय घडामोडींना वेग घेतला आहे. मुंबईतील सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात मनसे, शिवसेना, भाजप असे सर्वपक्षांनी आपापल्या परीनं निवडणूकीसाठी जोर लावला आहे. प्रत्येकजण सांभाळून पावले उचलत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मात्र आरोपप्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. या सर्वात मनसेनं निवडणूकीसाठी चांगलीचं कंबल कसली आहे. दरम्यान, आता यंदाचा मराठी भाषा दिन राज्यभर भव्य पद्धतीने साजरा करा, अशा सूचना त्यांनी मनसैनिकांना दिल्या आहेत.
ते म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेचे मराठी कार्ड येणार आहे. येत्या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत मनसेने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय मराठी भाषा दिन जोरदार साजरा करणार असल्याचेही जाहीर केलं आहे. राज्यात मराठी भाषा दिन भव्य पद्धतीने साजरा करा. अशा सूचना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.