महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २० फेब्रुवारी । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील नीलरत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता यावरून भाजपा आणि शिवेसेना वाद आणखी चिघळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भारत सरकारच्या (Central Govt.) मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला हे दिले आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या (Narayan Rane) आदीश बंगल्याच्या पाहाणी नाट्यानंतर आता नीलरत्न बंगल्यालावरही कारवाईचे आदेश दिले गेले आहेत. दरम्यान, काल नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) आणि मातोश्रीवर टीका केली होती. या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद आणखी पेटणार का अशी चर्चा सध्या सुरु आहे.
एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने नारायण राणे यांच्या मालवण येथील निल रत्न बंगला बांधताना सीआरझेड 2 चे उल्लंघन झाले अशी तक्रार ऑगस्ट 2021 ला केली होती. त्यानंतर तक्रारीची कॉपी आपल्याला मिळाल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिली आहे. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.