IND vs SL Series: भारताच्या कसोटी संघात निवड, कोण आहे सौरभ कुमार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २० फेब्रुवारी । पुढच्या आठवड्यापासून भारत आणि श्रीलंकेत (India vs Srilanka) क्रिकेट मालिकेला सुरुवात होत आहे. मायदेशात होणाऱ्या या मालिकेची सुरुवात टी-20 ने होणार आहे. भारत टी-20 चे तीन आणि त्यानंतर दोन कसोटी सामने खेळणार आहे. BCCI च्या निवड समितीने टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी संघ निवड जाहीर केली आहे. निवड समितीने संघ जाहीर करताना धक्का तंत्राचा वापर केला आहे. संघात अनेक मोठे बदल केले आहेत. चार सिनियर खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कसोटी मालिकेसाठी निवड समितीने एका नव्या चेहऱ्यालाही संधी दिली आहे. ऑलराऊंडर सौरभ कुमार (saurabh kumar) असं या नव्या खेळाडूचं नाव आहे. तो डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. सौरभ कुमारवर बऱ्याचकाळापासून निवड समितीचं लक्ष होतं, असे निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी सांगितलं. 28 वर्षाच्या सौरभला टीम इंडियात पहिल्यांदा स्थान मिळालं आहे.

IPL मध्ये कुठल्याही फ्रेंचायजीने विकत घेतलं नाही

सौरभ कुमार उत्तर प्रदेशच्या बागपतचा आहे. उत्तर प्रदेशकडून तो रणजी क्रिकेट खेळतो. आयपीएलच्या 2017 च्या सीजनमध्ये पुणे सुपर जायंट्सने 10 लाख रुपयांमध्ये सौरभ कुमारला विकत घेतलं होतं. पण त्यावेळी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल 2022 मध्ये सौरभची बेस प्राइस 20 लाख रुपये होती. पण कुठल्याही फ्रेंचायजीने त्याच्यावर बोली लावली नाही.

फर्स्ट क्लासमध्ये शानदार प्रदर्शन

सौरभ प्रथमश्रेणीचे 46 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 29.11 च्या सरासरीने 1572 धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीतही सौरभने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 196 विकेट घेतले आहेत. 32 धावात सात विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. सौरभने सोळावेळा 5 आणि सहा वेळा 10 विकेट घेतल्या आहेत.

भारतीय ‘अ’ संघाकडून दक्षिण आफ्रिका दौरा

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतीय ‘अ’ संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी सौरभ कुमारला संघात स्थान मिळालं होतं. त्या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यात चार विकेट घेऊन त्याने 23 धावा केल्या. भारतीय ‘अ’ संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामने खेळला होता. हे तिन्ही कसोटी सामने अनिर्णीत राहिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *