महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २० फेब्रुवारी । शिवसेना खासदार (Shiv Sena MP) संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपसाठी आक्षेपार्ह शब्दांचा (offensive language) वापर केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana CM K. Chandrashekhar Rao) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेणार आहेत. या भेटीसाठी सोनिया गांधींची परवानगी घेण्यात आली असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. त्यावर आता खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलंय.
हे लोक चु# आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात अशा चु# लोकांना स्थान उरणार नाही, अशी जळजळीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. किरीट सोमय्यांनी सवाल उपस्थित केला होता की, केसीआर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सोनिया गांधींकडून परवानगी घेण्यात आली का?
त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिलं की, असं कोण म्हणालं? देशात असे चु## लोक खूप आहेत. अशा लोकांना प्रश्न विचारणं शोभत नाही. राजकारण देशातील अशा चु## लोकांना 2024 नंतर संपवून टाकेल. 2024 नंतर देशातील राजकारण अत्यंत पारदर्शक असेल. 10 मार्चनंतर आपल्याला हे समजून येईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी भेटायला येत असेल तर त्यांचा अशाप्रकारे अपमान करणं हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. अशा चु## लोकांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवते.,
पुढे संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीच्यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची पायाभरणी होईल. या भेटीत देशाच्या आगामी वाटचालीबाबत दिशा निश्चित केली जाईल. मात्र, भाजपचे काही नेते उद्धव ठाकरे आणि केसीआर यांच्या भेटीची खिल्ली उडवत आहेत.
के. चंद्रशेखर राव हे शिष्टमंडळासह आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला येत आहेत. भाजपचे नेते याची खिल्ली उडवतात. त्यामुळे मी संबंधित नेत्यांना चु# बोललो. अशा लोकांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवते, ही योग्य बाब नाही. हा मुख्यमंत्र्यांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
बिगरभाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून त्रास दिला जात आहे. यामध्ये ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांचाही समावेश आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्वांनी मिळून भूमिका घेणं गरजेचं आहे. आजच्या बैठकीमध्ये राजकीय चर्चा होणार आहे. यामध्ये काँग्रेसची भूमिका देखील महत्वाची आहे. तसेच शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत, असंही संजय राऊत म्हणालेत.