महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २० फेब्रुवारी । निरोगी आरोग्यासाठी चांगली झोप आणि योग्य आहार आवश्यक असतो. आहाराच्या वेळाही पाळणे अत्यंत गरजेचे असते. कोणत्याही वेळी कोणताही पदार्थ खाल्ल्यास त्याचा उलट प्रभाव आपल्या आरोग्यवर पडू शकतो. अनेकांना सकाळी रिकाम्यापोटी चहा, कॉफी, मसालेदार पदार्थ खायची सवय असते. परंतु आहारतज्ज्ञांच्या मते रिकाम्या पोटी काही गोष्टी खाल्ल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. आणि सर्व आजारांचे मूळ तुमच्या आहारात आणि पोटातील पचनक्रियेमध्ये अलवंबून असते असे आयुर्वेद सांगते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी कोणते पदार्थ टाळायला हवे आणि कोणते खायला हवे ते जाणून घेऊया…
मसालेदार पदार्थ –
सकाळी रिकाम्या पोटी भजी, वडापाव, समोसा, कचोरी असे मसालेदार पदार्थ खाणे टाळा. यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो आणि पित्तामुळे डोकेदुखीही सुरू होऊ शकते. तसेच पोटीमध्ये जळजळही होऊ शकते. यामुळे एसिडीटीचा त्रास होऊ शकतो.
दही खाणे टाळा
सकाळी रिकाम्या पोटी दही खाणे टाळा. याचे मुख्य कारण म्हणजे दहीमध्ये लॅक्टिक एसिडचे प्रमाण भरपूर असते. यामुळे तुमचे पोट खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सकाळी-सकाळी दही खाल्ल्याने फार कमी प्रमाणात तुमच्या शरीराला लाभ मिळतात. त्यामुळे सकाळी दहीपासून लांबच राहा.
केळ नकोच
केळ्याचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळते. तसेच याचे सेवन केल्यामुळे पोट भरलेलं राहतं. मात्र रिकाम्या पोटी केळ्याचे सेवन तुम्ही करत असाल तर तुमच्या शरीरासाठी ते नुकसानदायी ठरू शकतं. सकाळी रिकाम्या पोटी केळ खाल्ल्याने रक्तामधील पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण अनियंत्रित राहते. त्यामुळे सकाळी-सकाळी केळ्याचे सेवन करणं टाळा.
आंबळ फळं
फळांचे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते, परंतु योग्यवेळी खाल्ले तरच. रिकाम्या पोटी आंबट फळे खाल्ले तर एसिडीटी होऊ शकते. तसेच यात फायबर आणि फ्रक्टोजचे प्रमाण अधिक असल्याने पचनचक्राचा वेग कमी होऊ शकतो.
काय सेवन कराल?
गरम पाणी आणि मध
सकाळी गरम पाण्यात मध मिसळून पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मधामध्ये विविध प्रकारचे खनिजे, जीवनसत्त्वे, फ्लेव्होनॉइड्स आणि एंजाइम असतात, जे तुमचे आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. याशिवाय, ते गरम पाण्यात मिसळल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
पपई खा
आतडे चांगले ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. पपई केवळ शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी उपयुक्त नाही तर ते खराब कोलेस्टेरॉल देखील कमी करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. मधुमेहींसाठीही पपईचे सेवन फायदेशीर मानले जाते.
सुका मेवा
नाश्त्यामध्ये मूठभर काजू खाणे आतडे निरोगी ठेवण्यासाठी सर्वात फायदेशीर मानले जाते. यामुळे केवळ पचन सुधारत नाही तर तुमच्या पोटाची पीएच पातळी सामान्य ठेवण्यास देखील मदत करते. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात मनुका, बदाम, काजू आणि पिस्ता यांसारख्या नटांचा समावेश करू शकता
लापशीचे सेवन
कॅलरी कमी करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर लापशी हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. यामुळे शरीरामधील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास देखील मदत मिळते. सकाळी रिकाम्या पोटी लापशीचे सेवन केल्यामुळे दिवसभर पोट भरलेले राहते. निरोगी शरीरासाठी उत्तम आणि हेल्दी खाद्यपदार्थांचे सेवन करणे शरिरासाठी नेहमीच उपयुक्त ठरते.