Chandrashekar Rao आणि Uddhav Thackeray यांमध्ये दोन तासांपासून चर्चा, Tejas Thackeray यांची हजेरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २० फेब्रुवारी । देशभरात पाच राज्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याबाहेर आपली ताकद आजमावून पाहत आहे. अशातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Chief Minister Chandrasekhar Rao ) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, यावेळी तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यामुळे तेजस ठाकरे सक्रीय राजकारणात सहभागी होतील का, अशी चर्चा रंगली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज सकाळी मुंबईत दाखल झाले. चंद्रशेखर राव यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी चंद्रशेखर राव आणि त्यांच्या सहकार्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या लहाने चिरंजीव तेजस ठाकरे यावेळी उपस्थितीत होते. खुद्द उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाची चंद्रशेखर राव यांना ओळख करून दिली.

विशेष म्हणजे, तेजस ठाकरे यांनी केसीआर यांच्याशी संवाद साधला. या टेबलवर फक्त तिघे म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, चंद्रशेखर राव आणि तेजस ठाकरे होते. तेजस यांनी आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या संशोधन आणि कार्याबद्दल माहिती दिल्याची माहिती समोर आली.

विशेष म्हणजे, आदित्य ठाकरे हे नेहमी मुख्यमंत्र्यांसोबत असतात. पण, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे हे साताऱ्यात हजर आहे. त्यामुळे त्यांची जागा आज तेजस ठाकरे यांनी भरून काढली. तेजस ठाकरे यांची उपस्थिती लक्ष वेधणारी आहे. तेजस ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तेजस ठाकरे आता सक्रीय राजकारणात सहभागी होतील का, अशी चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *