सोन्याचा भाव वर्षभराच्या उच्चांकावर ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २० फेब्रुवारी । रशिया-युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीने निर्माण झालेली अनिश्चितता आणि डॉलरसमोर रुपयात होत असलेल्या अवमूल्यनाने जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १९०० डॉलर प्रती औंस इतका वाढला आहे. कमॉडिटी बाजारात सोने ५०१२३ रुपयांवर गेले. मागील एक वर्षातील हा उच्चांकी स्तर आहे.

एमसीएक्सवर शुक्रवारी १० ग्रॅम सोन्याचा भाव ५०१२३ रुपयांवर बंद झाला. त्यात २६९ रुपयांची घसरण झाली. त्याआधी गुरुवारी सोन्याचा भाव तब्बल ८२० रुपयांनी वाढला होता.चांदीमध्ये मात्र ३५ रुपयांची किरकोळ वाढ झाली होती. शुक्रवारी बाजार बंद होताना एक किलो चांदीचा भाव ६३८९६ रुपयांवर स्थिरावला होता.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज रविवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९९० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ५०१८० रुपये इतका आहे. आज रविवारी दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९९० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५०१८० रुपये आहे.

चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४७३२० रुपये इतका वाढला आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१६२० रुपये इतका असून त्यात ३५० रुपयांची वाढ झाली. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९९० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०१८० रुपये इतका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *