महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २१ फेब्रुवारी । नारायण राणे (Narayan Rane) यांचा मुंबईतील (Mumbai) अदीश आणि मालवण येथील निलरत्न बंगला अडचणीत सापडला असून, आज पालिकेचे अधिकारी राणेंच्या आदीश बंगल्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील अदीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार होती. या तक्रारीनंतर बंगल्याची तपासणीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) नोटीस बजावण्यात आली आहे.
18 फेब्रुवारी रोजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्यानंतरा पुन्हा एकदा आज सकाळी दहा वाजता महापालिका पथक सांताक्रुज पोलीस स्टेशन येथे रवाना होणार आहेत. त्यानंतर तिथून सकाळी 11 वाजता जुहू येथे पोहोचणार आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या बंगल्यावर काय कारवाई होते हे पाहण्याचे ठरणार आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांचा मालवण येथील देखील बंगला अडचणीत सापडला आहे.
केंद्रानेच 9 ऑगस्ट 2021 ला दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. नारायण राणे यांच्या मालवणी येथील निल रत्न बंगला बांधताना सीआरझेड 2 चे उल्लंघन झाले अशी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी केली होती. त्यांतर भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरनला कारावाई करण्याचे आदेश 9 ऑगस्ट 2021 ला दिले होते.