महाराष्ट्रात वृद्धांपेक्षा तरुणांना बनवतोय कोरोना व्हायरस आपली शिकार

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन ;मुंबई, 28 मार्च : कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका हा वयस्कर व्यक्तींना असल्याचं सांगितलं जातं. आतापर्यंत जितकं रुग्ण आढळलेत, त्यातील बहुतेक रुग्ण वयोवृद्ध आहेत. मात्र महाराष्ट्रात हे चित्र वेगळं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तरुणांना (young people) कोरोनाव्हायरसने विळखा घातला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या 159 वर पोहोचली आहे. या रुग्णांमध्ये सर्वात जास्त तरुण आहेत.राज्य सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 154 रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण तरुण आणि प्रौढ आहेत. तर वयस्कर व्यक्तींचं प्रमाण कमी आहे.

या आकडेवारीनुसार,60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले फक्त 20 रुग्ण आहेत.तर 21 ते 60 वयोगटातील तब्बल 115 रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *