Shaktimaan Movie : ‘हा’ अभिनेता साकारणार ‘शक्तिमान’ची भूमिका? मुकेश खन्ना यांच्यासोबत करतोय शूटिंग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । छोट्या पडद्यावरील 90 च्या दशकातील प्रसिद्ध मालिका शक्तिमानला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या शोमधील शक्तिमान हे आयकॉनिक कॅरेक्टर आता मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी सोनी पिचर्स यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करून ‘शक्तिमान’ (Shaktimaan) मालिकेवर आधारित असणाऱ्या चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटात शक्तिमान ही भूमिका कोण साकारणार आहे?, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. पण नुकतीच एका अभिनेत्यानं खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

अभिनेता नकुल मेहता (Nakul Mehta) यानं मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. फोटोला नकुल यानं कॅप्शन दिलं, ‘शक्तिमान यांच्यासोबत शूटिंग करत आहे.’ हा फोटो शेअर करून नकुलनं मुकेश खन्ना यांना टॅग देखील केलं आहे. त्यामुळे आता शक्तिमान या मालिकेवर आधारित असणाऱ्या चित्रपटात नकुल प्रमुख भूमिका साकारणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

शक्तिमान ही मालिका 13 सप्टेंबर 1997 रोजी प्रसारित झाली. 2005 पर्यंत शक्तिमान ही मालिका प्रसारित होत होती. या मालिकेत मुकेश खन्ना यांनी गंगाधर आणि शक्तिमान या दोन भूमिका साकरल्या. नकुल मेहता याला इश्कबाज या मालिकेमधील त्याच्या शिवाय सिंह ओबेरॉय या भूमिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *