महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ फेब्रुवारी । श्रीलंका क्रिकेट संघ (Sri Lanka Team) भारत दौऱ्यावर आला आहे. उद्यापासून (24 फेब्रुवारी) टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रीलंकेने आपला संघी जाही केला असून यामध्ये भानुका राजपक्षे याला संधी न मिळाल्याने श्रीलंकेचे क्रिकेट फॅन्स नाराज झाले आहेत. त्यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाविरुद्ध (SLC) आंदोलन करत श्रीलंका क्रिकेट मुख्यालयाबाहेर विरोध प्रदर्शन केलं आहे.
भानुका राजपक्षे 2021 टी20 विश्वचषकातील दमदार कामगिरीनंतर चर्चेत आला होता. त्याने नोव्हेंबर, 2021 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने श्रीलंका संघाकडून पाच वनडे आणि 18 टी20 सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याच्या नावावर 89 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 320 धावा आहेत. त्याने जानेवारीमध्ये अचानक निवृत्ती घेतली, पण नंतर पुन्हा आपला निर्णय त्याने बदलला होता. दरम्यान आता त्याला संघात स्थान न दिल्याने चाहते नाराज झाले आहेत.
भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिकेचं वेळापत्रक:
पहिला टी-20 सामना- 24 फेब्रुवारी
दुसरा टी-20 सामना- 26 फेब्रुवारी
तिसरा टी-20 सामना- 27 फेब्रुवारी