Nawab Malik ED Remand : नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी, कोर्टात असा रंगला युक्तीवाद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ फेब्रुवारी । महाविकास आघाडी सरकारमधल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Arrest)) यांना तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर ईडीने (ED) अटक केली आहे. यानंतर नवाब मलिक यांची जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सेशन कोर्टात हजर करण्यात आलं. (enforcment dirctporate arrest to minority minister nawab malik)

54 नंबरच्या कोर्टात नवाब मलिक यांना हजर करण्यात आलं. ईडीकडून (ED) अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तीवाद केला. ईडीने नवाब मलिक यांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली.

सेशन कोर्टात तब्बल अडीच तास दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद झाला. यानंतर सेशन कोर्टाने नवाब मलिक (Nawab Malik) यांना 3 मार्चपर्यंत म्हणजे दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

नवाब मलिक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकिल अॅड. अमित देसाई यांनी युक्तीवाद केला. ही घटना २००३ पूर्वीची आहे. तेव्हा PMLA कायदा अस्तित्वात नव्हता, तेव्हा कारावाई का करण्यात आली नाही असा मुद्दा अॅड. अमित देसाई यांनी उपस्थित केला. आज अचानक 20 वर्षांनी अटक करुन तपास यंत्रणा १४ दिवसांची कोठडी कशी मागू शकत, असा युक्तीवाद अॅड. अमित देसाई यांनी केला.

जेव्हा तपास यंत्रणा अटक करतात, तेव्हा अधिकार जबाबदारीने वापरणं अपेक्षित असतं, कायद्याच्या चौकटीत कारवाई केली पाहिजे, बेकायदेशी अटकेची किंमत न्यायालयीन वेळ खर्ची घालून मोजली आहे, असंही अॅड. अमित देसाई यांनी म्हटलं आहे. गेल्या तीस वर्षांपासून दाऊद या गुन्हांसाठी ओळखाल जातो, पण एफआयआर ३ फेब्रुवारीलाच नोंदवला गेला. यापैकी कोणत्याही आरोपांशी मलिक यांचा संबंध जोडणारे पुरावे नाहीत असं अॅड. अमित देसाई यांनी कोर्टात सांगतिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *