Alert! फेक वेबसाइटपासून सावधान, सरकारचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ फेब्रुवारी । केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी ई-श्रम कार्डची (E-Shram Card) सुविधा सुरू केली होती. या अंतर्गत काही राज्य सरकारकडून दर महिन्याला मजुरांच्या अकाउंटमध्ये 500 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत ई-श्रम पोर्टलवर 25 कोटीहून अधिक मजुरांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं आहे. परंतु या योजनेच्या नावे आता फसवणुकीची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB ने ट्विट करत सतर्क केलं आहे.

ई-श्रम पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, ई-श्रम कार्डचा फायदा असंघटित क्षेत्रातील मजूर, भूमिहीन शेतकरी आणि 16 वर्षाहून अधिक विद्यार्थ्यांना मिळतो. या योजनेत सरकारकडून 2 लाख रुपयांपर्यंतचा फ्री अपघाती विमा दिला जातो. त्याशिवाय काही राज्य सरकारांकडून दर महिन्याला 500 रुपये अकाउंटमध्ये दिले जातात.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने ट्विट करत लोकांना सतर्क केलं आहे. सायबर क्रिमिनल्सकडून ई-श्रम पोर्टलप्रमाणेच दिसणारी फेक वेबसाइट तयार करण्यात आली आहे. जर तुम्ही ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणार असाल, तर ई-श्रमची अधिकृत वेबसाइट eshram.gov.in वरच लॉगइन करा असं PIB कडून सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय तुम्ही जवळच्या कॉमन सर्विस सेंटरमध्येही ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकता.

ई-श्रम पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, ई-श्रम कार्ड फ्रीमध्ये बनवता येतं. यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत. त्याशिवाय कोणी अनोळखी व्यक्ती ई-श्रम कार्डचे डिटेल्स, आधार कार्ड, बँक पासबुक अशा गोष्टी मागत असल्यास त्या देऊ नका.

तसंच अनोळखी कॉलवरही ई-श्रम कार्डसंबंधी माहिती शेअर करण्याची गरज नाही. कारण सरकारकडून कोणत्याही विभागातून फोन करुन ई-श्रम कार्डबाबत माहिती मागितली जात नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *