महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ फेब्रुवारी । संजय लीला भन्साळी यांच्या चर्चित अशा गंगुबाई काठियावाडी चित्रपटाला आता सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. उद्या हा चित्रपट कोणत्याही अटी आणि शर्तीविना प्रदर्शित होणार असल्याची माहिती कोर्टानं दिली आहे. या चित्रपटाच्या विरोधात गंगुबाई काठियावाडी यांचे दत्तक पुत्र यांनी कोर्टात धाव घेतली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या कुटूंबाची बदनामी झाली असून त्यामुळे आपण कोर्टात गेल्याचे त्यांनी सांगितले होते. आता कोर्टानं या प्रकरणावर चित्रपटाच्या बाजूनं निकाल दिला आहे. त्यामुळे बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी चित्रपटाच्या (Gangubai kathiyawadi Movie) प्रदर्शनाचा मार्ग (Entertainment News) मोकळा झाला आहे.
या चित्रपटाच्या विरोधात (Alia Bhatt) काहींनी कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे त्याच्या प्रदर्शनाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र तो प्रश्न आता निकाली निघाला असून प्रेक्षकांना हा सिनेमा येत्या 25 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये पाहता येणार आहे. भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये आलिया भट्ट, अजय देवगण, विजय राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून गंगुबाईच्या कुटूंबियांनी या चित्रपटाबाबत आक्षेप नोंदवत हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयानं गंगुबाई काठियावाडी चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) गंगुबाईच्या विरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या दोन्ही याचिका कोर्टानं रद्द केल्या आहेत. या चित्रपटात गंगुबाई काठीयावाडी यांचे चित्रण वास्तवाला सोडून रंगवल्याचे सांगत या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची बदनामी (family defamation script) केल्याचा आरोप गंगुबाई काठीयावाडी यांच्या कुटुंबियांनी (Gangubai Kathiawadi family allegations) केला होता. चित्रपटावर बंदी (film banned demand) घालण्याची मागणीही त्यांनी केली होती. लेखक एस. हुसेन झैदी यांच्या “माफिया क्वीन इन मुंबई” या पुस्तकावर आधारित संजय लीला भंसाली यांचा ‘गंगुबाई काठियावाडी’ नावाचा चित्रपट येऊ घातला आहे . आलिया भट या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे.