रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे शेअर बाजार कोसळला ; सेन्सेक्स २,७०० अकांनी गडगडला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ फेब्रुवारी । रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे (Russia-Ukraine war) भारतीय शेअर बाजार (stock market) वर्षातील सर्वांत वाईट टप्प्यातून जात आहे. आठवड्याच्या चौथ्या व्यापारी दिवशी रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केल्याने भारताच्या शेअर बाजाराला धक्का बसला. सेन्सेक्स २,७०० अंकांनी किंवा ४ टक्क्यांहून अधिक घसरत ५५ हजार अंकांच्या खाली आला. त्याचवेळी निफ्टीही ७५० अंकांच्या घसरणीसह १६,१०० अंकांच्या पातळीवर आला आहे. या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे १० लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

गुरुवारच्या (ता. २४) ट्रेडिंगमध्ये बीएसई निर्देशांकातील शीर्ष ३० समभाग रेड झोनमध्ये आहेत. सर्वांत मोठी घसरण बँकिंग आणि आयटी समभागांना कारणीभूत ठरली आहे. इंडसइंड बँकेचा शेअर जवळपास सात टक्क्यांनी घसरला आहे. यानंतर एशियन पेंट, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, टेक महिंद्रा, विप्रो, बजाज फायनान्स, एचसीएल, बजाज फिनसर्व्ह, मारुती यांच्या समभागातही चार टक्क्यांहून अधिक घसरण झाली. बाजारात विक्रीचे वातावरण असे आहे की बीएसई निर्देशांकातही सर्वांत कमी दोन टक्क्यांची घसरण झाली आहे.(Russia-Ukraine War Effect on Share Market)

रशिया-युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी अमेरिकेचे शेअर बाजारही मोठ्या घसरणीसह बंद झाले. त्याचा परिणाम गुरुवारी सकाळी देशांतर्गत शेअर बाजारात दिसून आला. सलग सहा सत्रांच्या घसरणीनंतर आज सातव्या सत्रातही सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले. बीएसईचा ३० शेअर्सचा महत्त्वाचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स सकाळी ९.१५ वाजता १८१३ अंकांनी घसरून ५५,४१८ वर उघडला. दुसरीकडे, निफ्टीमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली.

डाऊ जोन्स बुधवारी ४६४ अंकांनी घसरला आणि ३३,१३१ च्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी Nasdaq २.५७ टक्के किंवा ३४४ अंकांनी घसरला. या घसरणीमुळे Nasdaq १३,०३७च्या पातळीवर बंद झाला. एवढेच नाही तर S&P ने देखील ७९ अंकांची घसरण नोंदवली. देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण बुधवारी सलग सहाव्या व्यापार सत्रात सुरू राहिली आणि BSE सेन्सेक्स ६८.६२ अंकांनी घसरला. युक्रेनच्या संकटामुळे गुंतवणूकदारांच्या भावना प्रभावित झाल्या आहेत.

३० शेअर्सचा (stock market) सेन्सेक्स (Sensex) ६८.६२ अंकांनी घसरून ५७,२३२.०६ अंकांवर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८.९५ अंकांनी घसरून १७,०६३.२५ वर आला. व्यवहारादरम्यान चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही निर्देशांक इतर आशियाई बाजारांप्रमाणेच बहुतेक वेळा सकारात्मक श्रेणीत राहिले. कारण, युक्रेनच्या सीमेजवळ रशियन लष्करी हालचालींनंतर रशियावर पाश्चात्य निर्बंधांमुळे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भूमिका कमी होईल आणि युद्धाची भीती दूर होईल अशी गुंतवणूकदारांना आशा होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *