Whataspp Admin सदस्यांच्या पोस्टसाठी ऍडमिनला जबाबदार धरता येणार नाही!

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ फेब्रुवारी । जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअपचे (WhatsApp) जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. व्हॉट्सअपवर एखाद्या ग्रुपचा ( WhatsApp Group Admin) अ‍ॅडमिन होणे तर दिव्यच असते, कारण प्रत्येक सदस्याला सांभाळून घ्यावे लागते. तसेच सदस्यांच्या पोस्टसाठी अ‍ॅडमिनला जबाबदार धरले जाते. परंतु आता पुढील काळात सदस्यांच्या पोस्टसाठी अ‍ॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) दिला आहे. यामुळे व्हॉट्सअप अडमिनला दिलासा मिळाला आहे.

एका सुनावणी दरम्यान व्हॉट्सअपवर शेअर करण्यात आलेला एक आपत्तीजनक व्हिडीओ न्यायालयात सुनावण्यात आला. मार्च 2020 ला फ्रेंडस नावाच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये लहान मुले दाखवण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीसह ग्रुप बनवणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हाप पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर ग्रुप अ‍ॅडमिनने न्यायालयात धाव घेतली होती.

याचिकेवर सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने म्हटले की, व्हॉट्सअप ग्रुप अ‍ॅडमिनकडे फक्त अन्य सदस्यांना एका विशेष अधिकारांतर्गत एकत्र जोडण्याचे किंवा ग्रुपमधून काढून टाकण्याचे अधिकार असतात. ग्रुपमधील सदस्य काय पोस्ट करतात यावर अ‍ॅडमिनचे नियंत्रण नसते. तो सदस्यांनी पाठवलेल्या मेसेजला सेन्सर करू शकत नाही. त्यामुळे सदस्यांनी केलेल्या पोस्टसाठी त्याला उत्तरदायी ठरवता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *