रशिया-युक्रेन तणावामुळे देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा उडणार भडका ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ फेब्रुवारी । महागाईचा मोठा फटका देशवासीयांना बसणार आहे. प्रचंड वाढ पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होण्याची शक्यता आहे. युक्रेनवर रशियाचा हल्ला आणि युद्धाची शक्यता यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. सप्टेंबर 2014 नंतर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 वर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरु झाल्यास कच्चे तेल आणखी महाग होऊ शकते.

कच्च्या तेलाच्या किमतींवर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. 2022 मध्ये कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज खरा ठरला आहे, असे Goldman Sachs ने म्हटले होते. त्यावेळी, जे. पी. मॉर्गनने 2022 मध्ये प्रति बॅरल 125 डॉलर आणि 2023 मध्ये प्रति बॅरल 150 डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

कच्च्या तेलाच्या किमती पेटल्या आहेत. 2022 मध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 68.87 डॉलर होती. जे आता प्रति बॅरल 100 डॉलरच्या पातळीवर व्यवहार करत आहे. म्हणजेच दीड महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती खालच्या पातळीपासून 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *