महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ फेब्रुवारी । पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यापासून शहरात विविध नाट्यमय राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शहरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीने पालिकेतील सत्ताधारी असलेल्या भाजपचे दोन नगरसेवक गळाला लावले होते. त्यानंतर आता भाजपच्या आणखी एका नगरसेवकाने राजीनामा दिला आहे. (Pimpari Chinchwad Municipal Corporation)
पिंपळे निलखचे भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी आमदारांच्या हुकूमशाहीला कंटाळून मी राजीनामा देत आहे, असं म्हणत भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप कामठे यांनी राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली नसली तरी ते लवकरच राष्ट्रवादीत दाखल होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.