GOLD RATE TODAY: पुण्यात सोन्याची उच्चांकी भाववाढ, मुंबई-नाशकात पण भाववाढ ; जाणून घ्या, आजचे भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ फेब्रुवारी । सोन्याच्या भावात घसरणीनंतर तेजीचं सत्र दिसून आलं. रशिया-युक्रेन संकटाच्या दबावात शेअर बाजार कोसळला. गुंतवणुकदारांनी आपला मोर्चा सराफ बाजाराकडे वळविला. मुंबई, नागपूर, नाशिक व पुण्यात सोन्याच्या भावानं पन्नास हजारांचा टप्पा पार केला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात सरासरी 800 रुपयांची भाववाढ नोंदविली गेली. मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 46850 व 24 कॅरेट सोन्याला 51110 रुपये भाव मिळाला. मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भावात सरासरी 800 रुपयांची भाववाढ दिसून आली. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याची घसरण दिसून येत होती. शेअर्स बाजारातील अस्थिरता(SHARE MARKET), आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थघडामोडी यामुळे गुंतवणुकदारांत अस्थिरतेचं वातावरण दिसून येतं आहे. देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव-

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळे) :
• मुंबई- 51,110 रुपये (930 वाढ)
• पुणे- 51,200 रुपये (1070 वाढ)
• नागपूर- 51,200 रुपये (870 वाढ)
• नाशिक- 51,200 रुपये (1070 वाढ)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर (प्रति तोळे):
• मुंबई- 46,850 रुपये (850 वाढ)
• पुणे- 46,900 रुपये (950 वाढ)
• नागपूर- 46,900 रुपये ( 750 वाढ)
• नाशिक- 46,900 रुपये (950 वाढ)

गुंतवणुकदारांचा मोर्चा सोन्याकडं?
गेल्या आठवड्याभरात युक्रेन-रशिया वादाचे पडसाद भारतासह आंतरराष्ट्रीय अर्थजगतावर उमटत आहे. रशिया-युक्रेनच्या वादात युरोपीय राष्ट्रांनी उडी घेतली आहे. रशियाच्या आक्रमक पवित्र्यामुळे युद्धाचे ढग निर्माण झाले आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. युक्रेन-रशिया वादामुळे गुंतवणुकदारांवर अनिश्चिततेचं सावट आहे. शेअर बाजार कोसळल्यानंतर सोने गुंतवणुकीकडे कल दिसून आला. सोने गुंतवणूक सुरक्षित पर्याय मानला जातो. आगामी काळात तणाव कायम राहिल्यास सोन्याची भाववाढ सुरूच राहिल असा अंदाज गुंतवणूक तज्ज्ञांनी वर्तविला आहे. सोनं सर्वोच्च भावाचा टप्पा ओलांडणार का? याचं चित्रं आगामी काळातच स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *