महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि 24 फेब्रुवारी ।
व्यवसायाच्या दृष्टीने मार्च महिना काही राशींसाठी खूप चांगला असेल. या राशीच्या लोकांना मार्च महिन्यात कामाच्या ठिकाणी खूप काळजी घ्यावी लागेल. पहा मार्च 2022 कसा असेल ते.
मेष : मार्च कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा खराब होण्याची शक्यता आहे, रागावर नियंत्रण ठेवा. काही वाईट घटनांमुळे मानसिक त्रास होईल. वैवाहिक संबंधांमुळे तुमच्या जीवनात काही बाधा येईल.
वृषभ : मार्च महिन्यात आरोग्याची काळजी घ्या.एखाद्या न्यायालयीन खटल्याबाबत त्रास होऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास इतरांना अहंकार असा वाटू नये. खर्चावर नियंत्रण ठेवा. तुळशीचा रस प्राशन करा.
मिथुन: मार्च महिन्यात प्रियजनांच्या अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे काहीजण नाराज होऊ शकतात. आईसोबत थोडा वेळ घालवा, आईच्या प्रेमाने तुमच्या सर्व समस्या दूर होतील.
कर्क : मुलांबाबत काही तणाव असू शकतो. आरोग्याच्या किरकोळ समस्या निर्माण होतील, आहार आणि दिनचर्या सुधारून आरोग्य सुधारण्यास सुरुवात होईल. आठवड्याच्या शेवटी काही चांगली बातमी मिळू शकते.
सिंह : वाताचा शारीरिक त्रास होण्याची शक्यता . व्यायाम चालू ठेवा . जेवणाची पथ्ये पाळा . आणि रात्रीचे जागरण किंवा उशिरा झोपणे टाळणे चांगले. कामात नवीन संधी चालून येतील .
कन्या : मार्च महिन्यात कुटुंबासोबत जास्त वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकार्यांकडून प्रशंसा होईल, ज्यामुळे मानसिक आराम मिळेल. मामाकडून काही चांगली बातमी मिळेल.
तूळ : मार्च महिन्यात नात्यातील संतुलन बिघडेल, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. मनाच्या थकव्याचा परिणाम शरीरावर होईल. रोज सकाळी ब्राह्मीचे सेवन करा. व्यवसाय वाढीला योग्य काळ आहे.
वृश्चिक: आर्थिक समस्यांमुळे चिंता वाढू शकते. भविष्यकालीन पैसे साठवण्यावर लक्ष केंद्रीत करणे चांगले. वरिष्ठांकडून त्रास होईल. महिन्याच्या मध्यात काही चांगल्या बातम्या मिळतील.
धनु : ,मार्च महिन्यात थोडे सावध रहा कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याच्या समस्यांमुळे तुम्ही चिंतेत असाल. पैशाच्याबाबतीत सावधगिरी बाळगा, कोणत्याही प्रकारचे व्यवहार टाळणे चांगले असेल.
मकर : या महिन्यात कोणत्याही कार्यात आनंद मिळेल. एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या सहकार्याने यशाची नवी उमेद मिळेल. तुमच्यावर महिन्याच्या मध्यात राहूचा प्रभाव राहील, सावध राहा, अपघात होऊ शकतो.
कुंभ : मार्च महिन्यात कोणताही निर्णय विचार करून घ्या. नवीन संबंध किंवा भागीदारीसाठी हा महिना चांगला नाही, कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगा. इजा होण्याची शक्यता आहे प्रवासात सावधगिरी बाळगा.
मीन: मार्च महिन्यात धार्मिक रुची वाढेल आणि तुम्ही स्वतःला समजून घेण्यात अधिक वेळ द्याल. व्यायाम करताना डॉक्टरांकडे जावे लागणार नाही, याची काळजी घ्या.