महाराष्ट्रातील 1200 विद्यार्थी युक्रेनमध्ये, तीनशे विद्यार्थ्यांशी संपर्क : मंत्री वडेट्टीवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २६ फेब्रुवारी । राज्यातील अंदाजे १२०० विद्यार्थी युद्धग्रस्त युक्रेन देशात अडकले आहेत. त्यातील ३०० विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला आहे. राज्य नियंत्रण कक्ष या विद्यार्थ्यांशी संपर्कात आहे. या विद्यार्थ्यांसह अडकून पडलेल्या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती जिल्हास्तरावरही संकलित करण्याचे काम सुरू आहे. राज्य नियंत्रण कक्षाचे तसेच केंद्रीय नियंत्रण कक्षाशी संपर्कासाठी क्रमांक व ई-मेल जाहीर करण्यात आले असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांनीही हेल्पलाइन नंबर जाहीर केलेले आहेत. या माध्यमातून युक्रेनमध्ये अडकलेल्या जास्तीत जास्त भारतीयांना लवकरात लवकर भारतात आणण्याचे प्रयत्न केंद्र व विविध राज्य सरकारांनी सुरू केले आहेत.

१६ हजार भारतीयांना परत आणण्यासाठी योजना
रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या सुमारे १६ हजार भारतीयांना सुरक्षित परत आणणे जोखमीचे असले तरी भारत सरकारने यासाठी ठोस योजना आखली आहे. १. रोमानिया, हंगेरी आणि पोलंड या युक्रेनच्या शेजारी देशांतून विमानाने विद्यार्थी आणले जाऊ शकतात. २.भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांच्यानुसार, ‘रस्ते मार्गाने जर कीव्हहून निघाले तर पोलंडला ९ तासांत आणि रोमानियाला १२ तासांत पोहोचता येईल. ३. परराष्ट्र मंत्रालयाचा २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष.

युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी/नागरिक

मराठवाडा : ६० औरंगाबाद : ३, जालना: ७, परभणी : ४, नांदेड : १९, लातूर : २१, उस्मानाबाद : ६ विदर्भ : ४६ अमरावती : १०, अकोला :४, भंडारा : ४, चंद्रपूर : ६, यवतमाळ : ६, बुलडाणा : ६, गोंदिया : ३, गडचिरोली : २, नागपूर : ५ खान्देश : १५ जळगाव : ६, नंदुरबार : ९

नवी दिल्लीतील हेल्पलाइन्स
● टोल फ्री : 1800118797
● फोन : 011-23012113 / 23014104 / 23017905
● फॅक्स : 011-23088124
ईमेल situationroom@mea.gov.in या हेल्पलाइनवर संपर्क
राज्याचा नियंत्रण कक्ष

दूरध्वनी क्रमांक : 022-22027990 मोबाइल तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक : 9321587143 ई-मेल : controlroom@maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *