IND vs SL : ऋतुराज गायकवाड T20 सीरिजमधून आऊट! ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २६ फेब्रुवारी । टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. केएल राहुल (KL Rahul), दीपक चहर, (Deepak Chahar), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे प्रमुख खेळाडू सध्या दुखापतीमुळे बाहेर आहेत. या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीमध्ये आता आणखी एक नाव वाढलं आहे. भारताचा ओपनर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे श्रीलंका विरूद्धच्या टी20 सीरिजमधून (India vs Sri Lanka T20 Series) आऊट झाला आहे.

‘क्रिकबझ’ नं दिलेल्या वृत्तानुसार ऋतुराज दुसरी आणि तिसरी टी20 मॅच खेळणार नाही. त्याच्या जागी मयंक अग्रवालचा (Mayank Agarwal) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. लखनऊमध्ये झालेल्या सीरिजमधील पहिल्या मॅचच्यापूर्वी ऋतुराजच्या उजव्या मनगटाला दुखापत झाली होती.

या दुखापतीमुळे तो संपूर्ण सीरिज खेळू शकणार नाही. मयंक अग्रवालचा टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये समाेश करण्यात आला आहे. तो टीममधील अन्य सदस्यांसोबत सध्या चंदीगडमध्ये तयारी करतोय. त्याला चंदीगडहून धर्मशालामध्ये पाठवण्यात आलं आहे. एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये तो प्रवेश करतोय. त्यामुळे त्याला क्वारंटाईन राहण्याची गरज नाही. शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यासाठी तो उपलब्ध असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *