खासदार संभाजीराजे यांच्या आंदोलनास वाढता पाठिंबा; गृहमंत्र्यांनी घेतली भेट, उपोषणाचा निर्धार कायम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २८ फेब्रुवारी । आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनास राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी संभाजीराजेंची तब्येत बिघडली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी आझाद मैदानावर जाऊन संभाजीराजेंची भेट घेतली. त्या वेळी उपाेषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, सरकारकडून लेखी निर्णय आणि भरीव अंमलबजावणी सुरू हाेईपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याची घाेषणा संभाजीराजे यांनी केली आहे.

संभाजीराजे अशक्तपणा जाणवत आहे. त्यांच्या प्रकृतीची देखभाल करण्यासाठी एक वैद्यकीय पथक उपोषणस्थळी तैनात करण्यात आले असून दर सहा तासांनी त्यांची तपासणी केली जात असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

संभाजीराजेंंच्या आंदोलनास राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या समर्थनार्थ रविवारी लाक्षणिक उपाेषण केले. दरम्यान, आघाडी सरकार सर्व मागण्या पूर्ण करण्यास वचनबद्ध असून संभाजीराजेंनी बेमुदत उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहा (जि. रायगड) येथे केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *