महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २८ फेब्रुवारी । श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा आता कसोटी मालिकाविजयावर आहेत. त्यासाठी कसोटी संघानेही तयारी सुरू केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडलेल्या भारतीय खेळाडूंनी रविवारी मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये सराव सुरू केला. ४ मार्च रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी या स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.
माजी कर्णधार विराट कोहलीसह ऋषभ पंत, हनुमा विहारी, जयंत यादव, उमेश यादव, केएस भरत, सौरभ कुमार आणि आर अश्विन मोहालीत पोहोचले आहेत. रविवारी संध्याकाळी या खेळाडूंनी आयएस बिंद्रा स्टेडियमवरही सराव केला.
विराटची १००वी कसोटी
मोहालीत खेळला जाणारा कसोटी सामना विराट कोहलीच्या कारकिर्दीतील १००वा कसोटी सामना आहे. विराट कोहली आपली कसोटी संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करेल. बरेच दिवस शतक झळकावू न शकलेल्या विराटने या १००व्या कसोटीत शतक झळकावण्याची शक्यता आहे. विराटने रविवारी आयएस बिंद्रा स्टेडियमवर सराव केला. विराट कोहलीचा मैदानात धावतानाचा व्हिडिओही एका क्रिकेट चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
VIRAT KOHILI JOIN THE INDIA CAMP IN MOHALI AHEAD OF HIS 100th TEST #ViratKohli𓃵 pic.twitter.com/igIZu4SCoP
— Pintu (@McPintu) February 27, 2022
पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) देखील विराटच्या १००व्या कसोटीसाठी तयारी करत आहे. प्रेक्षकांना या सामन्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. असे असतानाही पीसीएला विराटचे हा सामना ासंस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडायची नाही. पीसीए या सामन्यात स्टेडियममध्ये विराटचा मोठा फलक लावणार आहे.