LPG Cylinder : महागाईचा भडका ; आजपासून व्यावसायिक सिलिंडर 105 रुपयांनी महागला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । रशिया-युक्रेन युद्धादरम्यान 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले. सिलिंडरचे दर 105 रुपयांनी वाढले आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ही वाढ करण्यात आली असून 7 मार्चनंतर घरगुती एलपीजी सिलिंडरही महाग होण्याची शक्यता आहे. सध्या घरगुती सिंलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

6 ऑक्टोबर 2021 पासून घरगुती LPG सिलिंडर स्वस्त किंवा महाग झालेले नाहीत. मात्र, या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 102 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. मात्र, या काळात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 170 रुपयांनी वाढ झाली आहे. 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1736 रुपये होती. नोव्हेंबरमध्ये ते 2000 आणि डिसेंबरमध्ये 2101 रुपये झाले. यानंतर, जानेवारीमध्ये ते पुन्हा स्वस्त झाले आणि फेब्रुवारी 2022 मध्ये ते स्वस्त झाले आणि 1907 रुपयांवर आले.

यावेळीही व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 19 किलोचा LPG सिलेंडर 1 मार्चपासून म्हणजेच आजपासून मुंबईत 1857 रुपयांऐवजी 1963 रुपयांना मिळणार आहे. तर, दिल्लीत 1907 रुपयांऐवजी 2012 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात आता व्यावसायिक सिलिंडर 1987 रुपयांऐवजी 2095 रुपयांना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *