![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । Weather Update : देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे तिथे थंडीचा कडाका अद्याप सुरुच आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत आज ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच जोरदार वारे वाहत असल्याने थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. दिल्लीत आज कमाल तापमान 26 अंश तर किमान तापमान 13 अंश राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात देखील तापमानात चढ उतार कायम आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण देखील आहे. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे. राज्यात आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील सांगली, सोलापूर, अकोला, परभणी या जिल्ह्यांमध्ये तापमान 35 अंशाच्या पुढे असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे.