अनलॉकची नवी नियमावली ; लोकल प्रवासासाठी लसीच्या दोन डोसची अट मागे घेण्यास नकार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ मार्च । राज्य सरकारने आज अनलॉकची (Unlock) नवी नियमावली कोर्टात सादर केलीय. यावेळी लोकल (Local Pass) प्रवासासाठी लसीच्या दोन डोसची (Vaccination) अट मागे घेण्याची मागणी होत होती. मात्र राज्य सरकारने ही सक्ती मागे घेण्यास कोर्टात नकार दिला आहे. त्यामुळे लोकस प्रवासासाठी पूर्वीप्रमाणेच लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक असणार आहे. गेल्या जवळपास अडीच वर्षापासून कोरोनाने (Corona) जगाला हैराण करून सोडले आहे. कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट अशा अनेक लाटा (Corona Third Wave) जगाने पाहिल्या आहे. तिसऱ्या लाटेपेक्षा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेदना अत्यंत भयंकर आहेत. कित्येक दिवस लोकांना लॉकाडाऊनमुळे (lockdown) घरात बसून राहवं लागलं आहे. आपले अनेक दिवस कोणत्या ना कोणत्या निर्बंधात गेले आहेत. मात्र तिसऱ्या लाटेवेळी राबवलेल्या कडक नियमावलीमुळे आता कुठे तिसरी लाट कमी होताना दिसतेय. त्यामुळे निर्बंध शिथिल होत आहेत.

शंभर टक्के लसीकरणाचे टार्गेट

लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून जगातील सर्वच देशांनी लसीकरणावर मोठा भर दिला होता. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला भारत थोपवू शकला आहे. जास्तीत जास्त लसीकरण झाल्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव आणि वेदना जास्त जाणवल्या नाहीत. मात्र दुसऱ्या लाटेत भारतात खूप नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्या वेदना अजून ताज्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन जसजशी लस उपलब्ध होईल तसतसे प्रशासन लसीकरणावर भर देत आहे. त्यामुळे लोकल प्रवासासाठीच्या लसीकरणाबाबतही राज्य सरकार सक्तीची भूमिका घेताना दिसत आहे.

लसीकरणाचा टक्का चांगला

महाराष्ट्रातही लसीकरणाचा टक्का अतिशय चांगला आहे. मात्र अद्याप शंभर टक्के लसीकरण पूर्ण झालेले नाही. महाराष्ट्रतील शाळा पुन्हा सुरू झाल्याने शासन विद्यार्थ्याचेही लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर देत आहे. लोकांनीही जागृतने चांगला प्रतिसाद दिल्यास महाराष्ट्रही लवकरच शंभर टक्के लसीकरण पूर्ण करेल, असा विश्वास आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. जेवढ्या लवकर लसीकरण पूर्ण होईल, तेवढ्या लवकर परिस्थिती अधिक सुधारत जाणार आहे. त्यामुळे गोव्याच्या पाऊलावर पाऊल टाकतं महाराष्ट्रातलंही लसीकरण 100 ठक्के पूर्ण करण्याची गरज आहे. काही दिवसापूर्वीच गोवा शंभर टक्का लसीकरण करणारे देशातले पहिले राज्य ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *