अणु हल्ल्याचा इशारा दिलेला नाही; रशियाच्या मंत्र्यांचे मोठं विधान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । Russia Ukraine War : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर येत असून, अणु हल्ल्याचा कोणताही इशारा रशियाकडून देण्यात आलेला नव्हता, असे मोठं विधान रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी केले आहे. तसेच युक्रेनसोबतचे सुरु असलेले युद्ध संपवण्यासाठी आम्ही चर्चेस तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर दोन्ही देशांमदील युद्ध थांबणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Russian Foreign Minister Sergey Lavrov On Nuclear War)

दरम्यान, रशियाने अणु हल्ल्याचा कोणताही इशारा दिलेला नव्हता असे म्हणत अणुयुद्धाचा हा विचार पश्चिमी देशांतील नेत्यांच्या डोक्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, युक्रेनसोबतचे युद्ध संपवण्यासाठी आम्ही चर्चेस तयार असल्याचे लावरोव यांनी रशियन माध्यमांशी बोलल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी या दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये युक्रेन आणि बेलारुसच्या सीमा भागात चर्चेची पहिली फेरी पार पडली होती. मात्र, त्यामध्ये ठोस असा निर्णय न घेण्यात आल्याने ही बैठक निष्फळ ठरली होती. त्यानंतर आज यो दोन्ही देशांमध्ये आज चर्चेची दुसरी फेरी पार पडणार असल्याचे सांगितले जात असून, या बैठकीत युद्धविरामावर चर्चा करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बैठक पोलंड आणि बेलारुस या ठिकाणच्या सीमाभागात होणार आहे.

युक्रेनच्या खारकिव्हमधून आसपासच्या देशांच्या सीमेवर अडकलेल्या भारतीय लोकांना बाहेर काढण्यासाठी 6 तास हल्ले थांबवण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यास मदत होणार आहे. रशियाने खार किव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या लष्कराकडून मानवी ढाल बनवल्याचा आरोप होत असताना भारतीय जनतेसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.

रशिया-युक्रेन या दोन देशांमध्ये युद्धाचा आजचा आठवा दिल असून, अद्यापही हे युद्ध थांबवण्यात कोणत्याही देशाला यश आलेले नाही. दरम्यान, युक्रेनमध्ये आडकलेल्या भारतीय नागरिकांना सोडवण्यासाठी भारत सरकारकडून आवश्यक ती सर्व पाऊले उचलली जात असून, मिशन गंगा अंतर्गत आतापर्यंत अनेक भारतीय विद्यार्थांना मायदेशात परत आणण्यात आले आहे. परंतु, आजही युक्रेनमध्ये हजारो विद्यार्थी अडकून असून त्यांच्या सुखरुप सुटकेसाठी रशियाने सहा तास हल्ले थांबवणार असल्याचे सांगितले जात आहे.

बुधवारी रात्री भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली त्यावेळी मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत चिंता व्यक्त केली. त्यानंतर भारताच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांच्या सुखरुप सुटकेसाठी रशियाने वरील निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. रशियाने खारकिव्हमधील हल्ले सहा तासांसाठी थांबवण्याचे मान्य केले असून, यामुळे येथे अडकलेले सर्व भारतीय विद्यार्थी आणि नागरिक तात्काळ येथून बाहेर पडू शकण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *