IND vs SL 1st Test : विराट कोहलीच्या 100 व्या टेस्टमध्ये अशी असेल टीम इंडियाची Playing11

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । भारतीय क्रिकेट टीम 2 टेस्ट मॅचच्या सीरिजमधील पहिली टेस्ट खेळण्यासाठी शुक्रवारी श्रीलंकेविरूद्ध (India vs Sri Lanka) मोहालीमध्ये उतरणार आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (PCA) मैदानात होणाऱ्या या टेस्टमध्ये सर्वांचं लक्ष विराट कोहलीवर (Virat Kohli 100th Test) असेल. विराटची ही 100 वी टेस्ट मॅच आहे. विराटला श्रीलंका विरूद्धच्या टी20 सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली होती. सकाळी 9.30 वाजता ही टेस्ट मॅच सुरू होणार आहे.

टीम इंडियाकडून ओपनिंगला कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) उतरणार हे नक्की आहे. केएल राहुल दुखापतीमुळे या सीरिजमध्ये खेळणार नाही. त्याच्या जागेवर मयंक ओपनिंगला खेळणार आहे. रोहित मोठ्या कालावधीनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये दिसणार आहे. तो दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला नव्हता. माजी कॅप्टन विराट कोहलीनं दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले नाही. त्याने शेवटचे शतक नोव्हेंबर 2019 मध्ये लगावले होते. आता या टेस्टला संस्मरणीय करण्याचा विराटचा प्रयत्न असेल.

मागच्या वर्षी पदार्पणातील टेस्टमध्ये शतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) फॉर्म पाहाता त्याची प्लेईंग11 मधील जागा नक्की आहे. श्रेयसनं श्रीलंका विरूद्धच्या सीरिजमधील तीन्ही मॅचमध्ये अर्धशतक झळकावले होते. तसंच तो एकदाही आऊट झाला नाही. हनुमा विहारीला टेस्ट क्रिकेटमधील जागा नियमित करण्याची ही चांगली संधी आहे. विकेट किपर ऋषभ पंत (Rishabh Pant) विश्रांतीनंतर टेस्ट सीरिजमध्ये खेळणार आहे. पंतला विराटसोबत टी20 सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आली होती.

अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विनवर (R Ashwin) बॉल आणि बॅटसह चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी आहे. तर टीममधील दुसरा स्पिनर म्हणून रविंद्र जडेजाचा समावेश होणार आहे. जडेजानं दुखापतीनंतर श्रीलंका विरूद्धच्या टी20 सीरिजमध्ये पुनरागमन केले होते. तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) , मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हे तीन फास्ट बॉलर पहिल्या टेस्टमध्ये खेळू शकतात.

रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *