महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ मार्च । रशियानं युक्रेनवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा आजचा नववा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरांवर क्रूझ मिसाईलच्या सहाय्यानं हल्ले सुरूच आहेत. रशियन युद्धनौकांनी काळ्या समुद्रातही युक्रेनच्या समुद्री सेनेला घेराव घातलाय. याच दरम्यान, शत्रुसमोर गुडघे टेकण्यास नकार देणाऱ्या युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी समोरा-समोर चर्चेचं खुलं आव्हान दिलंय.
‘मी चावा घेत नाही’
झेलेन्स्की यांनी पत्रकार परिषदेसमोर एका टेबलावर आमने-सामने बसून खुल्या चर्चा करण्याचं आव्हान पुतीन यांना दिलंय. ‘माहीत नाही पुतीन कशाला घाबरत आहेत? मी शेजारी आहे, मी कुणालाही चावा घेत नाही, एक सामान्य व्यक्ती आहे. पुतीन यांनी माझ्यासोबत बसून चर्चा करायला हवी’ असं गंमतीशीर पद्धतीनं झेलेन्स्की यांनी म्हटलंय.
सोबतच, झेलेन्स्की यांनी रशियाला सडेतोड प्रत्यूत्तर देण्यासाठी आणखीन हत्यारं पुरवण्याची मागणी पाश्चिमात्य देशांना केलीय.