पेट्रोल-डिझेल प्रति लीटर ‘इतक्या’ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ मार्च । रशिया-युक्रेन वादाचा आजचा नववा दिवस आहे. युद्धाची व्याप्ती वाढत चालली असून याचे परिणाम जागतिक बाजारावरही पाहिला मिळतायत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत.

ब्रेंट क्रूडचे प्रतिबॅरलचे दर आता 117 डॉलर्सवर गेले असून, परिणामी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरात लिटरमागे 12 ते 15 रुपयांनी वाढविले जातील, अशी शक्यता आहे. इंधन दरवाढीचा फटका बसू नये, यासाठी अनेक देशांनी त्यांच्या ‘स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह’चा आसरा घेतला आहे.

डिसेंबरमध्ये जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे प्रतिबॅरलचे दर 70 डॉलर्सच्या आसपास होते. अवघ्या तीन महिन्यात हे दर तब्बल ११७ डॉलर्सवर पोहचले आहेत. क्रूड ऑईलचे दर भडकल्याने अनेक देशांची अर्थव्यवस्था डगमगण्याची शक्यता आहे.

जागतिक बाजारात इंधन महाग होत असल्याने प्रदीर्घ काळात इंधन दरवाढ रोखल्याने कंपन्यांवरील दवाब वाढला आहे. त्यामुळे पेट्रोलिअम कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबईत पेट्रोलचा भाव प्रतिलीटर १०९.९८ रुपये इतका आहे, तर डिझेलचा भाव प्रतिलीटर ९४.१४ रुपये इतका आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ तर डिझेल ८६.६७ प्रति लीटर आहे.

निवडणुका संपल्यावर दर वाढणार
दरम्यान, केंद्र सरकारने ३ नोव्हेंबरला एक्साईज कर कमी करत नागरिकांना दिलासा दिला होता. पण आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आटोपल्या आहेत. त्यामुळे लवकरच नागरिकांना पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *