महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ मार्च । राज्यातील कोरोनाचा (Maharashtra Corona Cases) प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 525 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 992 रुग्णे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 206 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 5211 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4629 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 582 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
राज्यात आज नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 15 हजार 711 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.07 टक्के आहे. सध्या राज्यात 28,878 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 595 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 81 लाख 38 हजार 182 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.