Gold-Silver Price Today : सोने, चांदी दरात प्रचंड वाढ ; कमाॅडिटी बाजारात सोन्याचा नवा उच्चांक,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ७ मार्च । रशिया आणि युक्रेनमधील युद्ध तीव्र झाल्याने बड्या गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. युद्धाने कमाॅडिटी आणि भांडवली बाजारात प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे केंद्रीय बँका आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोन्यामधील गुंतवणूक ओघ वाढवला आहे. त्याचेच पडसाद आज कमाॅडिटी बाजारात दिसून आले. जागतिक बाजारात सोन्याचा भाव २००० डाॅलरवर गेला आहे तर मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याने ५३७०० रुपयांची पातळी ओलांडली. आज सोनं १३०० रुपयांनी महागले.

सध्या एमसीएक्सवर १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३४७० रुपये इतका असून त्यात ९११ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी आज सोन्याचा भाव ५३७९७ रुपये इतका वाढला होता. चांदीमध्ये देखील आज १४५९ रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ७०६१९ रुपये इतका झाला आहे.

यापूर्वी शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव १०४२ रुपयांनी वाढला होता. सोने दर ५२९९१ रुपयांवर स्थिरावला होता. त्याचबरोबर चांदीमध्ये शुक्रवारी १३५९ रुपयांची वाढ झाली होती. चांदीचा भाव ६९१७३ रुपयांवर बंद झाला होता. दोन सत्रात सोन २५०० रुपयांनी महागले आहे. मागील १८ महिन्यातला सोन्याचा हा उच्चांकी स्तर आहे.

आज जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली. स्पॉट गोल्डचा भाव १.५ टक्क्यांनी वाढला असून तो २०००.६९ डॉलरपर्यंत गेला आहे. यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव २०००.२० डाॅलर इतका झाला असून त्यात १.७ टक्का वाढ झाली. आज चांदीचा भाव १.७ टक्क्यांनी वाढला असून तो २६.०९ डॉलर प्रती औंस इतका आहे.

आज सराफा बाजारात सोनं एक हजारांनी महागले आहे. Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९४०० रुपये इतका वाढला आहे. २४ कॅरेट सोन्याचा मुंबईतील भाव ५३८९० रुपये इतका आहे. त्यात १०९० रुपयांची वाढ झाली.

आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९४०० रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५३८९० रुपये इतका झाला. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०५५० रुपये इतका असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५५१४५ रुपये झाला. त्यात ९२५ रुपयांची वाढ झाली. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९८०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३८९० रुपये इतका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *