महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ७ मार्च । उत्तर प्रदेशात आज सातव्या टप्प्यातील मतदान (UP Election 2022) पार पडलं. पूर्वांचलमध्ये ५४ जागांसाठी मतदान घेण्यात आले. याठिकाणी स्वतः पंतप्रधान मोदींनी सभा घेतल्या आहेत. तसेच समाजवादी पक्षाचं (SP) देखील इथं वर्चस्व पाहायला मिळतं. त्यामुळे हा टप्पा सर्वांसाठी महत्वाचा आहे. आज सर्वांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे. त्यानंतर लगेच एक्झिट पोल (UP Election Exit Polls) आले असून त्याचे अंदाज समोर आले आहेत.
काय सांगतात एक्झिट पोल? –
उत्तर प्रदेशात रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा योगी सरकार येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भाजपसह युतीला २५२ ते २७७ जागा
सपा आणि इतर पक्ष ११९ ते १३४ जागा
बसपा ७ ते १५ जागा
काँग्रेसला ३ ते ८ जागा
इतर पक्षांना २ ते ६ जागा
न्यूज १८ एक्झिट पोल
भाजप : 262-277
सपा : 119-134
बसपा : 7-15
काँग्रेस : 3-8