आता राष्ट्रवादी IT च्या रडारवर ; 40 ठिकाणी सर्च ऑपरेशन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ८ मार्च । शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस IT च्या रडारवर आहे (IT Raids in Maharashtra). महाराष्ट्रात 40 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. यात 25 निवासस्थानं आणि कार्यालयं आहेत. काही पंचतारांकित हॉटेल्समध्ये आयकर अधिकारी पोहोचले आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटकातील बंगळुरूमध्येही सर्च ऑपरेशन सुरू आहे. सर्च ऑपरेशनमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांवरही छापा टाकण्यात आला आहे. यात त्यांच्या 3 बहिणींशी संबंधीत कंपन्या असल्याची माहिती समोर आली आहे.

याआधी आयकर खात्याने मुंबईत 5 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत (Income Tax Department Raid). पहाटे 5 वाजल्यापासून हे सर्च ऑपरेशन सुरू आहे. यात परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parb) यांचे निकटवर्तीय आणि शिवसैनिक संजय कदम (Sanjay Kadam) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारली. सकाळपासूनच कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाडसत्रं सुरू केलं. तसंच राहुल कनाल यांच्या निवासस्थानी आयकर विभाग छापे टाकले आहे.

पुण्यातील आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही आयटीने छापा मारल्याची सूत्राची माहिती आहे. संजय मानजी कदम हे शिवसेना पदाधिकारी आहेत. त्यांच्या घरावर आज सकाळी आयकर विभागाने छापेमारी सुरू केली. अंधेरीच्या कैलास नगरमधील स्वान लेक कैलास या इमारतीतील 16 व्या मजल्यावर संजय कदम यांचं घर आहे. संजय कदम अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *