Fuel Price Hike: तयार राहा, लवकरच भडका उडणार ! पेट्रोलचे दर वाढवू द्या; कंपनीची केंद्राकडे मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ मार्च । पाच राज्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया संपुष्टात येताच तेल उत्पादक कंपन्यांनी इंधन दरात वाढ करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. इंडियन ऑइल कंपनीने याबाबत पुढाकार घेतला असून पेट्रोल दरांत १२ ते १७ रुपये वाढ करण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला केली आहे.

रशिया-युक्रेनमधील तणावामुळे जागतिक बाजारात कच्चे तेल महागले आहे. किमती आंतरराष्ट्रीय बाजारात १३० डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. देशांतर्गत तेल कंपन्यांना ही बाब ध्यानात घेऊन इंधनदरांचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

नागपुरात सीएनजी १२० रुपये किलो
नागपूर : पाच राज्यांतील निवडणुका संपताच नागपुरात सीएनजीच्या किमतीत तब्बल २० टक्के वाढ होऊन दर १२० रुपयांवर पोहोचले आहेत. नागपुरात सीएनजी देशात सर्वाधिक महाग असून, त्याची किंमत पेट्रोल व डिझेलपेक्षाही जास्त आहे. वर्षभरापासून नागपुरात सीएनजीचे दर १०१ रुपये किलो होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *