महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ मार्च । पुणेकरांचा प्रवास आता महागण्याची शक्यता आहे. पीएमपीची बस सेवा तोट्यात सुरु आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी मनपा ग्रामीण भागातील तिकीटदरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील तिकीटाचे दर हे एसटी बस प्रमाणेच होतील.. तसंच रोजचा 70 रुपयांचा पासही बंद केला जाणार आहे. या निर्णयाचा फटका लाखो सामान्य प्रवाशांना बसणार आहे.