महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ९ मार्च । गेले काही दिवस सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आह. मात्र हे फोटो पाहून यावर विश्वास बसला असेल तर थोडं थांबा. हे फोटो खरे नसून त्यावर विश्वास ठेवू नका.
अभिनेता सलमान खानच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात त्याला त्याच्या लग्नाबाबत हमखास प्रश्न विचारला जातो. पण गेल्या काही दिवसात सलमानखानचा सोनाक्षी सिन्हाच्या बोटात अंगठी घालताना फोटो व्हायरल झाला आणि चाहत्यांमध्ये आनंद पसरला. पण हा आनंद फार काळ राहीला नाही. कारण व्हायरल होणारा फोटो अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाच्या फोटो असून त्यांच्या चेहऱ्यावर सलमान आणि सोनाक्षीचा चेहरा लावून व्हायरल केला आहे.
तुम्हीही सलमान आणि सोनाक्षीच्या नवे फोटोशॉप्ड व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित व्हाल. फोटोमध्ये सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा नवरदेव आणि नववधूच्या पोशाखात दिसत आहेत. दोघांनी एकमेकांना फुलांचा हार घातलेला आहे. वर-वधूच्या पोशाखात असलेले दोघंही एकमेकांना नमस्कार करताना फोटोत दिसत आहेत. वरुण आणि नताशाने त्यांच्या लग्नात अशीच पोज दिली होती.