महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ९ मार्च । मोदी सरकार ( Modi government ) या वर्षापासूनच कामगार कायद्यातील ( labor law ) सुधारणा अर्थात नवीन लेबर कोड लागू करण्याच्या तयारीत आहेत. नवीन लेबर कोड लागू करण्यास उशीर होत असल्याने केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ( Union Ministry of Labor and Employment ) वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. हे मंत्रालय 2022 मध्येच नवा लेबर कोड ( four labor codes in 2022 ) लागू करण्याचा विचार करत आहे. हा लेबर कोड लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक अर्जित रजांची (Earned Leave) संख्या 300 होईल. मोदी सरकारने नव्या लेबर कोडची अंमलबजावणी सुरू केल्यावर अर्जित रजा 240 वरून 300 पर्यंत वाढू शकतात.
लेबर कोडच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत कामगार मंत्रालय, कामगार संघटना आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींमध्ये कामाचे तास, वार्षिक सुट्ट्या, पेन्शन, पीएफ, टेक होम सॅलरी, रिटायरमेंट आदींबाबत चर्चा झाली, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा 240 वरून 300 पर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली होती.
केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी ‘मनी कंट्रोल डॉट कॉम’शी बोलताना सांगितले की, ‘नवीन लेबर कोड लागू करण्यापूर्वी मंत्रालय प्रत्येक राज्याला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सर्व राज्यांशी सातत्याने बोलत आहोत. बहुतेक सर्वजण तयार असून, ते नवीन मसुदा नियम बनवत आहेत. काही राज्यं यावर विचार करत आहेत. कोणतीही मोठी योजना किंवा प्रोग्रॅम आल्यास सर्वांना सोबत घेऊन चालणार आहोत. नवीन लेबर कोड केव्हा लागू होईल, याची कोणतीही अंतिम मुदत देणं कठीण आहे. परंतु 2022 पर्यंत नवीन चार लेबर कोड लागू होतील अशी अपेक्षा आहे.’
नव्या लेबर कोडचे नियम लागू झाले, की कर्मचाऱ्यांच्या वार्षिक अर्जित रजांची संख्या 300 होऊ शकते. पण यासोबतच विविध फायदे कामगारांना होऊ शकतात. त्यामुळे याची अंमलबजावणी कधीपासून होते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.