महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० मार्च । सगळ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच बाजी मारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. समाजवादीच्या अखिलेश यादव यांनी मोदी-योगींना जबरदस्त टक्कर दिली असली तरी भाजप आपली सत्ता कायम राखणार असल्याचं या पोलमधून स्पष्ट झालं आहे. एकूण 403 सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये सत्ता स्थापण करण्यासाठी एकूण 202 जागांची गरज आहे. भाजपला यावेळीही स्पष्ट बहुमत मिळणार तर अखिलेश यादव सत्तेपासून दूर राहणार असंच या एक्झिट पोलमधून दिसतंय.