Lalu Prasad Yadav : लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर ..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० मार्च । राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली आहे. त्याच्यावर रिम्सच्या पेइंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. लालू यादव यांची किडनी सातत्याने खराब होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या प्रकरणात डायलिसिस आवश्यक आहे. लालू यादव यांची किडनी 80 टक्क्यांहून अधिक खराब झाली आहे. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून येत नाही. डॉक्टरांनी सांगितले आहे की, औषधांच्या डोसमध्ये आणि त्यांच्या आहारामध्ये बदल केले जाऊ शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी लालू प्रसाद यादव यांच्या सीरम क्रिएटिन लेव्हलची तपासणी करण्यात आली, जी 3.5 वरून 4.2 झाली. किडनीची कार्य करण्याची क्षमता सीरम क्रिएटिनिनद्वारे दिसून येते. किडनीची स्थिती अशीच राहिल्यास लालू प्रसाद यादव यांना लवकरच डायलिसिस करावे लागू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांचा रक्तदाब सामान्य असून रक्तातील साखरेची स्थितीही ठीक आहे.

लालू यादव अनेक आजारांनी त्रस्त
लालू यादव यांना मधुमेह, रक्तदाब, किडनी, दात अशा अनेक आजारांनी ग्रासले असून त्यांच्यावर रिम्समधील डॉक्टर सातत्याने उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या दातावर रूट कॅनाल ट्रीटमेंट करण्यात आली होती. लालू प्रसाद यादव दीर्घकाळापासून अनेक आजारांनी त्रस्त आहेत, त्या आधारावर जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणी झाल्यानंतर 11 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. चारा घोटाळा प्रकरणात त्यांना पाच वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *