महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० मार्च । उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल १० मार्चला लागणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या निकालासाठी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू .
सर्व ५ राज्यांसाठी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू. सुरवातीला पोस्टाद्वारे आलेल्या मतांची मोजणी होईल. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्समधील (EVM) मतांची मोजणी केली . उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या छोट्या राज्यांच्या निवडणुकांचे कल लवकर कळू शकतील. उत्तर प्रदेश हे मोठे राज्य आहे. यूपीत विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत. यामुळे यूपीचा कल लागण्यास काहीसा वेळ लागू शकतो.
उत्तर प्रदेशात भाजपची पुन्हा सत्ता येऊ शकते. तर उत्तराखंड आणि गोव्यामध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे अंदाज एक्झिट पोलमधून मांडण्यात आले आहेत.
‘असे’ पाहा विधानसभा निवडणुकांचे निकल
– विधानसभा निवडणुकांचे निकाल निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून देण्यात येतील. https://results.eci.gov.in वर तुम्हाला निकाल पाहता येतील
– निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर गेल्यावर General Elections to Assembly Constituency March 2022 या वर क्लिक करा
– यानतंर तुमची एक नवीन विंडो ओपन होईल, त्यात राज्यांची यादी समोर येईल
– तुम्हाला हव्या असलेल्या राज्यावर क्लिक करा
– तुम्ही व्होटर हेल्पलाइन अॅपवर (voter helpline app ) जाऊनही निकाल पाहू शकता. गुगल प्ले स्टोअर वरून तुम्ही हे अॅप डाउनलोड करू शकता