महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० मार्च । संपूर्ण जगभरात जागतिक मूत्रपिंड दिन (World Kidney Day 2022) साजरा होत आहे. लोकांना मूत्रपिंडाच्या (किडनी) आजारांपासून वाचवणं हा याचा उद्देश आहे. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळं आपल्या लघवीचा रंग बदलतो. याशिवाय मूत्रपिंड निकामी होण्याची अनेक लक्षणं आहेत. मूत्रपिंड निकामी होणं म्हणजेच किडनी फेल्युअरमध्ये (kidney failure) जाणवणाऱ्या लघवीचा रंग आणि त्याच्या सुरुवातीच्या इतर लक्षणांबद्दल जाणून घेऊया.
झी न्यूज दिलेल्या बातमीनुसार, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा काही औषधांमुळं मूत्रपिंड निकामी होऊ शकतं. मूत्रपिंड निकामी झाल्याची लक्षणं आजार बराच वाढल्यानंतर दिसतात. मात्र, काही समस्या त्याची सुरुवातीची लक्षणं म्हणून दिसू शकतात.
लघवी कमी होणं
पाणी भरल्यानं सांधेदुखी
किडनी फेल्युअरची लक्षणं (Kidney Failure Symptoms)
मूत्रपिंड निकामी झाल्यावर काही लक्षणं दिसतात. NIH च्या मते, मूत्रपिंड निकामी झाल्यामुळं खालील लक्षणं दिसून येतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
डोकेदुखी सुरू होणं
अंगावर खाज सुटणं
दिवसभर थकवा
रात्री झोपं न लागणं
वजन कमी होणं किंवा भूक न लागणे
शारीरिक कमजोरी
स्मरणशक्ती कमी होणं किंवा लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता इ.
मूत्राचा रंग किडनीच्या आरोग्याविषयी (Urine Colour about kidney health) :
हेल्थलाइनच्या मते, लघवीचा रंग काही प्रमाणात मूत्रपिंडाच्या आरोग्याबद्दल सूचित करू शकतो.
स्वच्छ किंवा फिकट पिवळा रंग – शरीरात पाण्याची पातळी योग्य असणं
गडद पिवळा रंग – शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन
केशरी रंग – शरीरात पाण्याची तीव्र कमतरता किंवा रक्तातील पित्ताचं लक्षण
गुलाबी किंवा लाल रंग – लघवीतील रक्तामुळे किंवा स्ट्रॉबेरी आणि बीटसारखे पदार्थ खाल्ल्यामुळं
हे वाचा – रोजच्या या सवयींमुळे अनेकांची हाडे कमकुवत होत जातात, तुम्हीही तेच करत नाही ना?
लघवीत फेस दिसणं – लघवीतील प्रथिनांचं प्रमाण मूत्रपिंडाच्या आजाराचं लक्षण दर्शवतं. जसं की, लघवीत फेस दिसत
असल्यास ते मूत्रपिंड निकामी होण्याचं लक्षण असू शकतं आदी.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. महाराष्ट्र २४ त्याची हमी देत नाही.)