महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० मार्च । पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या कोवोव्हॅक्सला मंजुरी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे या लशीची 2 ते 11 वयोगटातील मुलांवरही ट्रायल सुरू आहे आणि लवकरच ही ट्रायल पूर्ण होणार आहे. त्यानंतर लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्गही लवकरच मोकळा होण्याची आशा आहे.
Covovax Nanoparticle NVX-CoV2373 ही अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी फर्म Novavax द्वारे विकसित केलेली प्रोटीन-आधारित लस आहे. त्याचा भारतातील सीरम इन्स्टिट्यूटशी करार आहे. भारतात ते Covovax या ब्रँड नावानं ओळखलं जातं. ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.
डीसीजीआयने (DCGI) कोवोवॅक्स लशीच्या आपात्कालीन वापरला परवानगी दिली आहे. प्रौढ व्यक्ती आणि 12 पेक्षा जास्त वयाच्या मुलांना ही लस दिली जाणार आहे. त्यामुळे 12-18 वयोगटातील म्हणजे किशोरवयीन मुलांसाठी आता आणखी एका लशीचा पर्याय उपलब्ध झाला आहे..