महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० मार्च । नागपूरच्या क्वेटा कॉलनी येथे पाच ते सहा अर्भक कचऱ्यात फेकल्याची घटना समोर आली आहे. पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनीही घटनास्थळावरून कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून तीन विकसित तर काही अविकसित भ्रूण आढळल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी एक मानवी किडनी आणि काही मानवी हाडे सापडल्याची माहिती राजमाने यांनी दिली आहे. ‘एबीपी माझा’ने ही बातमी दिली आहे.
आजूबाजूला अनेक रुग्णालय आणि नर्सिंग होम असून त्या ठिकाणातील बायोमेडिकल वेस्टमध्ये हे भ्रूण या ठिकाणी फेकण्यात आलेत का याचा तपास पोलीस करतील असं राजमाने म्हणाले. दरम्यान हे अवैध गर्भपाताचे प्रकार आहे का याचाही तपास केला जाईल अशी माहिती राजमाने यांनी दिली.