महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० मार्च । “बाळासाहेबांची शिवसेना आहे, डुप्लिकेट, नकली काही नाही, जे सत्य आहे ते शिवसैनिक बोलणार. आमचं राजकारण नकलांवर उभा नाहीय, आमचं राजकारण कामावरती, स्वाभिमानावर, संघर्षावर उभं आहे”, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणावेळी संजय राऊत यांची नक्कल केली. तसंच संजय राऊत नेहमी अॅक्शन करत असतात, कॅमेरा हटला की नॉर्मल होतात. ही अॅक्शन कुठून येते असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राऊत बोलत होते.
“सध्या सगळ्यांनी बोलावं अशी परिस्थिती आहे. ईडीने आम्हाला बोलावलं म्हणून गप्प बसलो नाही, आम्ही बोलत राहाणार बोलत राहू आम्हाला कुणाची भीती नाही, आम्ही कुणाचे मिंधे नाही”, असं राऊत म्हणाले.