महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ मार्च । राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं (IMD) वर्तवला होता. त्यानुसार नागपुरात (Nagpur) आजूबाजूच्या परिसरात पावसाच्या हलक्या सरी, तर नाशिक (Nashik), कळवणमध्ये गारांसह पावसाने हजेरी लावली. तसेच येत्या तीन ते चार तासांत आणखी काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
नाशिक, सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, अमरावती आणि आजूबाजूच्या काही भागात ढगाळ वातावरण होते. काही तासांपूर्वी नाशिक, कळवणमध्ये मुसळधार पाऊस झाला. तसेच नागपुरातही विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. येत्या तीन ते चार तासांत पुन्हा पुणे, नाशिकसह साताऱ्यात घाट माथ्यावर वादळ, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच सकाळपासून ढगाळ वातावरण असलेल्या जिल्ह्यात देखील पावासाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढले आहे. काही ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पण, वातावरणात अचानक बदल झाला असून येत्या तीन ते चार तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आहे. याबाबत मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला आहे. maharashtra weather forecast heavy rain fall predicted in nashik dhule nandurbar district
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कोकण, मराठवाडासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाची नोंद झाली आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसत असून या हंगामातील पिकांचे नुकसान होतं आहे. राज्यातील काही प्रदेशात गारपीट होत असल्याने पिकांवर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असा अंदाजही वर्तवला जात आहे. ऐन हंगामात कोकणात हलक्या सरी बरसल्या. तसेच नाशिक परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.