महाराष्ट्र 24 ; ऑनलाइन ; पुणे- केशवनगर मुंढवा येथे तुळजाभवानी प्रतिष्ठान व राज्य युवा परिषद आयोजित पीएसआय ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने केशवनगर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात ९७ रक्तदात्यानी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. मा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेले निवेदनात सांगितले की, राज्यात रक्तसाठा आडवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे रक्तदान करा त्या अनुषंगाने रक्तदान शिबिराचें आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक शक्ती प्रधान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.तसेच शिबिरात डॉ गणेश पाटील, डॉ सतीश शितोळे उपस्थित होते. यावेळी प्रवीण प्रधान ,गणेश धनगर ,राहुल प्रधान,नामदेव गिरे,धनराज व्हनाजे ,अभिजित गुजर, अक्षय लांजुळकर आदींनी मोलाची कामगिरी केली.
